केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा अन्न प्रक्रिया व्यवसाय सुरू करू शकता आणि तुमची आर्थिक उन्नती करू शकता.

योजनेचे उद्दिष्टे:

  • अन्न प्रक्रिया उद्योगाची क्षमता वाढवणे
  • उत्पादनांचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग मजबूत करणे
  • संघटित पुरवठा साखळीशी जोडणी
  • सूक्ष्म उद्योगांना सामाईक सुविधा, प्रयोगशाळा, साठवण, पॅकेजिंग आणि मार्केटिंग सारख्या सेवा उपलब्ध करून देणे

योजनेनुसार लाभ:

  • वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग:
    • एकूण प्रकल्प किमतीच्या 35% पर्यंत आणि जास्तीत जास्त ₹10 लाखांपर्यंत अनुदान
  • सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योग (सामाईक सुविधा):
    • प्रकल्प किमतीच्या 35% पर्यंत आणि जास्तीत जास्त ₹3 कोटीपर्यंत अनुदान
  • मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी:
    • पात्र प्रकल्प खर्चाच्या 50% पर्यंत आणि केंद्र सरकारने निश्चित केलेल्या कमाल आर्थिक मर्यादेपर्यंत अनुदान
  • बीज भांडवल:
    • ग्रामीण आणि शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहाय्यता गटातील सदस्यांना, गटांना आणि त्यांच्या संघांना लहान मशीनरी खरेदीसाठी आणि कार्यभांडवल म्हणून मदत
    • प्रत्येक सदस्याला जास्तीत जास्त ₹40,000 आणि स्वयंसहाय्यता गटाला जास्तीत जास्त ₹4 लाख

कोणते अन्न प्रक्रिया उद्योग पात्र आहेत?

  • दूध प्रक्रिया: खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आंबारखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी
  • मसाले प्रक्रिया: चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी
  • फळे आणि भाज्या प्रक्रिया: आंबा, सफरचंद, आवळा, मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादींपासून बनवलेले प्रक्रिया उद्योग, जाम, जेली, आईस्क्रीम, रबडी
  • तेल आणि तेलबिया प्रक्रिया: शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम आणि सर्व प्रकारची तेल उत्पादने
  • पावडर उत्पादन प्रक्रिया: काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, ज्वारी, गहू, मिरची, धने, जिरे, गूळ, हळद
  • पशुखाद्य निर्मिती: मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इत्यादी
  • कडधान्य प्रक्रिया: हरभरा आणि इतर डाळी (पॉलिशिंग), बेसन तयार करणे इत्यादी
  • तांदूळ मिल: चिउडा, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी
  • बेकरी उत्पादन प्रक्रिया: बिस्किटे, खपली गहू बिस्किटे, मैदा बिस्किटे, नानकटाई, क्रीमरोल