महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संवर्धन आणि स्त्री सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. "कन्या वन समृद्धी" या योजनेंतर्गत, ज्या शेतकरी दाम्पत्यांच्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल, त्यांना शासनाकडून विविध प्रकारच्या 10 झाडांच्या रोपा विनामूल्य देण्यात येतील.
या योजनेचा मुख्य उद्देश वनक्षेत्राव्यतिरिक्त अधिक जागेवर झाडे लावून वनांचे क्षेत्र वाढविणे हा आहे. शिवाय, मुलींच्या जन्मामुळे कुटुंबाला मिळणाऱ्या रोपांमुळे नवजात मुलीच्या भविष्यकालीन गरजा भागविण्यास मदत होईल. वृक्षलागवड आणि त्यांच्या संगोपनातून मुलींच्या संरक्षणाचा संदेश देण्याचा हेतू आहे.
योजनेची कार्यपद्धती अशी आहे की, मुलीच्या जन्मानंतर तिच्या पालकांनी ग्रामपंचायतीकडे विहित अर्ज करावा. त्यानंतर पावसाळ्यात येणाऱ्या एका आठवड्यात शेतकऱ्यांनी गावातील आपल्या जागेत 10 झाडे लावावीत. यासाठी ग्रामपंचायतीमार्फत विविध प्रकारच्या 10 रोपा दिल्या जातील.
झाडाची निगा व संगोपन यासह लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे उत्पन्न मुलीच्या उच्च शिक्षण, कौशल्य विकास व रोजगारासाठी वापरता येईल. रोपवाटिकेकडून मिळणाऱ्या रोपांमध्ये सागवान आंबा, चिंच, जांभूळ, फणस अशा विविध झाडांचा समावेश असेल.
ही योजना फक्त त्या शेतकरी कुटुंबांपुरती मर्यादित आहे ज्यांच्याकडे जास्तित जास्त दोन मुली आहेत आणि त्यानंतर कुटुंब नियोजन केले जाईल. तसेच सरपंचाकडून ग्रामसेवक, उपसरपंच यांच्या मदतीने जनजागृती करून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले जाईल.
एकंदरीत ही योजना ही वनसंवर्धन आणि मुलीच्या सक्षमीकरणाच्या उद्दिष्टांना एकत्रितपणे हातभार लावणारी ठरणार आहे. महिला सबलीकरण आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर ही योजना प्रकाश टाकते. अशा प्रकल्पांमुळे मुलींना न्याय्य दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याचा संदेश देत आहे.

0 टिप्पण्या